अरे माणसा
अरे माणसा
माणसाच्याच भीतीपोटी न हे सर्व...!
उभारलास माणसा तू शस्त्रास्त्रे
लढावू विमाने आणि लढावू जहाजे पण
निकामीच ठरले आज या सूक्ष्म विषाणूपुढे...!
का करत होतास रे माणसा...?
तू युद्ध माणसा सोबतच
आज त्याच तुझ्या बंदुका आणि अणुबाँब
काय बिघडवले त्या कोरोना विषाणूचा...?
अरे माणसा तेव्हाच कदाचित चुकलास तू
आणि तुझा प्राधान्यक्रम सुद्धा
शस्त्रास्त्रे उभारण्यापेक्षा दवाखाने उभारला असतास तर...?
कमीतकमी मृत्यूचा तांडव तर रोखता आलं असतं ना....
आज हरलास रे माणसा तू
कदाचित यालाही तूच जबाबदार आहेस
आजपर्यंत तू माणसापासूनच संरक्षण करायला शिकलास
म्हणूनच या कोरोनानी तुला विळखा घातलाय.....
प्रत्येक युद्ध नाहीच जिंकता येत बंदुकांच्या धाकावर
हे तर शिकवलेच या कोरोनानी
मग आता तरी उभार तू दवाखाने
भविष्यात कामी येतील तुझ्याच आरोग्यासाठी..!
