लोक
लोक
नको तिथं गर्दी करतात लोक
गर्दीतही आनंद लुटतात लोक
मदतीची विवंचना ऐकून मात्र
गर्दीतून पळवाट शोधतात लोक
उगेसच एखाद्यावर हसतात लोक
नको त्याला बदनाम करतात लोक
कुणास ठाऊक का वागतात असे
नुसतंच शहाणपण सांगतात लोक
खरेपणाचा आव आणतात लोक
आपल्यांची फसवणूक करतात लोक
काय साध्य करत असतील यातून
कुणास ठाऊक असे का वागतात लोक
खाऊन खाऊन पोट फुगवतात लोक
गरिबांना लुटतात लुबाडतात लोक
गर्दीत माणसांच्या दिसेना माणूस
मानवातील माणुसकी हरवतात लोक
गरिबांची थट्टा करतात लोक
माज श्रीमंतीचा करतात लोक
जिवंतपणी कुणी दाखवत नाही दया
खांदा द्यायला मात्र सरसावतात लोक
किती स्वार्थ भावनेने वागतात लोक
फक्त स्वतःचा भला साधतात लोक
खटाटोप हा संपत्ती लाटण्याचा
रक्तपातही जणू घडवतात लोक
