STORYMIRROR

Rutuja Misale

Romance

3  

Rutuja Misale

Romance

अधुरी प्रीत

अधुरी प्रीत

1 min
345

काल पुन्हा एकदा असंच फिरत होतो रस्त्यावर

आणि गेलो परत त्याच वळणावर.....

पुन्हा एकदा चाहूल लागली त्याच सुगंधाची

पुन्हा एकदा हुरहूर होऊ लागली मनाची

वाटेतील ती मोगऱ्याची वेल आज ही तशीच आहे तिथे

नजर रस्त्यावर होती आणि फुलांचे सडे होते.

कदाचित ती हि तुझ्याच येण्याची वाट बघत उभी असेल तिथे!

कधी तुझ्या केसांमधून खुलून दिसणारा तो मोगरा

आज कुणास ठाऊक एवढा सुकलेला का होता

कदाचित तो हि आता वाट बघून थकलेला होता.

पुढे गेलो ते थेट तुझ्या दारातच.......

अन् तुझी प्रतिमा पुन्हा आली नजरेसमोर

पुन्हा तुझ्या हसण्याचा आवाज घुमु लागला कानामध्ये

तुझ्या पैंजणान दुमदुमून गेला आसमंत सगळा

मन तुझ्या स्मृतीत पार वेडावून गेलं पुन्हा

आणि

तुला पाहण्याच्या इच्छेने जीव डोळ्यात आणून एकटक बघत राहिलो दाराकडे तुझ्या......

पण तु दिसली नाहीस अन् पुन्हा हताश मनाने मि परतलो तेथून

अधुरी प्रीत माझी पुन्हा छळु लागली मला

आठवण तुझी पुन्हा छळु लागली मला

तुला गमवल्याच दुःख सारखं सलतं मनात माझ्या

एकांतात माझ्या हा विरह किती छळतो मला

तुझ्या साठी घेतलेली ती पैंजणाची जोडी आता सोबती आहे माझी

बोलतो मि नेहमी तिच्याशी अन ऐकतो कधी छुमछुम तिची

तुझ्या माझ्या प्रेमाचं गुपित सार तिला ठाऊक आहे.

कधी ना कधी वळणावर कुठल्यातरी अनोळखी होऊन भेटू पुन्हा

करू ओळख नवी पुन्हा,करू सुरुवात नवी पुन्हा

पुन्हा करू प्रेम नव्याने,पुन्हा भरू श्वास नवा

पुन्हा येऊ सोबती दोघे,तेव्हा करू संसार नवा....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance