STORYMIRROR

Rutuja Misale

Children Stories Inspirational Children

2  

Rutuja Misale

Children Stories Inspirational Children

सांग देवा हे जीणं मि कसं जगावं

सांग देवा हे जीणं मि कसं जगावं

1 min
36

डोईवर बापाचं छत नाही,मायेची ऊब नाही

जग अनाथ म्हणतं स्वतःच मला अस्तित्व नाही


फूटपाथ माझं घर,अंथरून झाली धरती

अन आभाळ झाली चादर


कुठे आली बापाची मांडी नी कुठला मायेचा पदर

फाटलेल्या या नशिबाला कुठवर अजून शिवावं


फुटल्या नशिबाचं गाऱ्हाणं कोणापुढ मांडावं

सांग देवा हे जीणं मि कसं जगावं


सकाळच्या प्रहरी उठावं,रस्त्यावरती हिंडावं

दोन घास भाकरीसाठी दिवसभर भटकावं


कधी याच्याजवळ कधी त्याच्याकडे 

मि आतुरल्या नजरेने बघावं,अन


'हट भिखारी' म्हणून त्यानं दूर दूर ढकलावं

पुन्हा उठून मि तेच गाडं पुढं हाकावं


सांग देवा हे जीणं मि कसं जगावं

बापाचा धाक,पिरमाची हाक नाय


धर्म नाय,कुल नाही मला कुठली जात नाही

कुठली आली शाळा नि कुठली आली पाटी


माझा जन्म फकस्त भिख मागण्यासाठी

करपल्या काळजाचं दुखणं कोणाला सांगावं


कुणाच्या पदराआड दडावं आणि पोट भरलं 

नाही म्हणून धायमोकलुन रडावं


गोठ्यातील गाय-वासरांना बघून मि आतल्या आत किती झुरावं

सांग देवा हे जीणं मि कसं जगावं


Rate this content
Log in