साथ
साथ
माझ्यासोबत आहेस तू सदैव अशीच सोबत देशील का..
कधी चिडले,रागवले मी तर मला समजून घेशील ना..?
जीवनातल्या प्रत्येक शब्दांना तुझी साथ
हवी आहे माझ्या गीतामध्ये तू सूर होशील ना..
माझ्या अश्रूंना तुझा बांध हवा आहे
माझ्या प्रत्येक शब्दामध्ये तुझा गंध हवा आहे
या जीवनात आणखी काही नको
फक्त सदैव साथ देशील ना...
मन माझं आहे तुझ्याकडे
हाती फक्त माझा हात घेशील ना ..
असेन सदैव मी तुझीच अन् तुझ्यासाठी सर्व काही
तू ही मला जन्माची साथ देशील ना ...
कधी लाडिक बोलतोस,
हक्काने सांगतोस
असाच बोलत राहशील ना..
रुसवा काढायची अन् तुला
हसवण्याची संधी
मला देशील ना ..
येतील अनेक नाती पुढे,
आपल नातं अतूट ठेवशील ना...
सुखी राहा नेहमी तू, माझ ही सुख वाटून घेशील ना ..
माझ्या सोबत आहेस तू सदैव
पण अशीच सोबत नेहमी देशील ना..

