STORYMIRROR

Sandeep Jangam

Romance

3  

Sandeep Jangam

Romance

प्रश्न

प्रश्न

1 min
361

न राहवून हि

एक दिवस प्रश्न पडला चंद्राला..

मग..

विचारता झाला तो आपल्या चांदणीला..

खरंच मी आवडतो का ग तुजला..?

विचारलेल्या प्रश्नाने चांदणी हि गहिवरली..

गहिवरल्या अंतःकरणाने तीहि उत्तरली..

अरे वेड्या..

मग ठरल्या वेळी उगाच येते का रे भेटीला..

कुणीही जाग नसतं..

तेंव्हा मीच असतेना रे तूझ्या सोबतीला..

तीचे उत्तर ऐकून चंद्र म्हणाला तीला..

असं काय पाहिलंस माझ्या काळोखात..

पुन्हा आसवं दाटली तिच्या नेत्रांत..

दाटल्या कंठानी ती पुन्हा उत्तरली..

सगळीच स्वप्न पुरी होतं नसतात उजेडात

पुरी होण्याआधी ती पाहते मी तूझ्या अंधारात..

केलेल्या प्रश्नाने... दिलेल्या उत्तराने

मनातल सारं काही समजलं..

तेंव्हापासून नित्य नेमानं दोघांनीही ठरवलं..

गायब व्हायचं उजेडात..

अन भेटायचं रोजच्या अंधारात..

अन भेटायचं रोजच्या अंधारात..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance