आहेस तू माझा
आहेस तू माझा
कोठून आला आहेस तू,
माझ्या स्वप्नात येतो तोच का तू,
माझ्या तुटलेल्या मनाला सावरणारा तू,
परत हसायला शिकवणारा तू,
परत पुसायला शिकवणारा तू,
माझ्या भुतकाळासकट स्वीकारणारा तू,
माझ्या सौंदर्याला जपले तू,
माझ्या आजारपणाचे औषध तू,
रात्रीच्या गुलाबी खंडातील ऊब तू,
पहाटेच्या किरणांचा अलगद स्पर्श तू,
माझ्यवर जीवापाड प्रेम करणारा तू,
माझ्या आयुष्याचा सार आहेस तू,
खरच खूप छान आहेस तू.
खरच खूप छान आहेस तू.....

