आम्ही सावित्रीच्या लेकी
आम्ही सावित्रीच्या लेकी
1 min
130
सावित्रीच्या लेकी आम्ही
वसा तुझा चालवू |
सूर्य, चंद्र, तारे जोवर
गुणांचा महिमा वर्णू तोवर |
आदर्शाची खाण तू
मातीचे तुझ्या गीत गाऊन |
कणखर बाणा
ताठ माना |
प्रारंभी कार्याच्या
तुज वंदन आम्ही करू |
रोवली तू शिक्षणाचा
महामेरू या जगती |
म्हणून आली लेखणी आमुच्या हाती
लेखणीला भास्करासारखे तापी ठेवू ||