अबोली
अबोली
तुलाच कळे चित्त माझ्या मनीचे
परी तुला न कळे माझ्या मनी जे?
ऐकतोस तू भाषा माझ्या प्रितीची
जरी मला न फुटे शब्द त्या भाषेचे
सारे गुपित दडले माझे तुजपाशी
तरी मग का म्हणतोस मज अबोली?
माझ्या शब्दांचे पंख हरविले
तुझ्याच नजरेच्या बाणांनी
निःशब्द होवूनी बसले माझे भान
तुझ्याच रसिक हस्यानी
मज वेडीला बेदुंध करते कोण?
तुझ्याच वेडेपणाची बेधुंदी
वाहता-वाहता शब्द ओठांवरती अडती
तुझ्याच वाचेतून ते ओसंडती
तुला न कळते, का कळते?
माझ्या शब्दांची मौली तुझ्याचपाशी
ह्या वेडीला सोबत तुज वेड्याची
तुझ्याच मनी का येते शंका संगतीची?

