जाती
जाती
जातीपुढं जाती उभ्या टाकतात अन्
सुरू होतं उच्च-निचतेचं युध्द ..
मी शिवाजीचा मी बाबांचा
वाटण्या होऊन लोकांची हरवते शुध्द
तलवारी, सुरी, काट्या
वाटलंच तर घोडा चालून जातो
लाल रक्ताच्या सड्यात
शिवाजी अन् बाबाही एक होऊन जातो
केली जाते विटंबना
चौकातल्या एखाद्या महापुरूषाची
अन् ठिणगी पडते जाती-जातीत
अन् दंगल घडते रोषाची
सगळेच कापले जातात
लाल रक्ताच्या उधळणीने
पोलीस गाडीच्या सायरनचे
वाजते भेसुर गाणे
घटना, स्वराज्य अन् कलामांची
कमाल विसरायला लावते दंगल
रस्ता , नाका , गल्ली होते
हिंस्त्र प्राण्याचं जंगल
लूट होते अब्रूची
भोगली जातात शरीरं
वासानांधाच्या चंगळीचं तसं
दंगल म्हणजे वारं
ना महामानवाने सांगितले ना छत्रपतीने
लढा सारे दंगली दंगलीने
हक्कासाठी लढण्यास सांगितले
अन् जोडण्यास आतून मने
