STORYMIRROR

Santosh Jadhav

Others

2  

Santosh Jadhav

Others

"स्त्री"

"स्त्री"

1 min
14K


ती मला प्रेरित करेल 

असं चुकूनही वाटलं नव्हतं 

पुरुष अहंकारामुळे कदाचित 

उशिरा लक्षात येतं 

हरेक अडचणीवर तिच्याकडे 

मात करण्याची कला दिसली 

'फी' कशी भरायची बाळाची 

हे विचारल्यावर हाती हात देऊन हसली 

सहनशील जास्त बाई असते 

हे तिला पाहिल्यावर कळलं 

संसार कसा बसा भागताना 

तिनं कुरबुरी करायचं टाळलं

अहंकार पुरूषी माझा 

पुरता मी मारुन टाकला 

तिच्या हुशारीमुळे कदाचित 

आजवर संसार टिकला 

ती कायम प्रेरित करत आली 

आई , बहिण , बायको रूपात

म्हणून तर जगतोय केवळ 

तिच्या प्रेरणेने सुखात 


Rate this content
Log in