बालकामगार
बालकामगार
1 min
2.1K
बालकामगार मुक्ती
जिकडे पाहावा तिकडे
दिसतो बालकामगार आहे .
कधी हॉटेल कधी टपरी
कधी तळीरामाचा बार आहे.
गंभीर गुन्ह्यास या
तशी डोळेझाक आहे .
नशीबी जन्म गरीबीचा
हीच मेख आहे .
फायदा पाहातो मालक
पोरगा नेक आहे .
वय दाखवून कामगार भरती
कागदोपत्री फेक आहे..
शिकण्याचे वय त्याचे
फाटकं घर आहे .
बालकामगार या संख्येचा
वाढतो दर आहे .
लहानग्या या जीवाची
काळजी घे शासना .
आमलात आण योजना
बालकामगार प्राथमिक शिक्षणा.