STORYMIRROR

Santosh Jadhav

Others

2  

Santosh Jadhav

Others

बाबा

बाबा

1 min
3K


बापाच्या निर्विकार डोळ्यातून 

टचकन पाणी येते अन् 

जीवाच्या तुकड्याला कुणीतरी 

वाजत गाजत घेऊन जातं .

सगळ्याच संकटातून छकोलीस 

सोडवणारा बापाचा नाविलाज होतो 

कंठ दाटलेल्या बापाचा 

बेसुर रडण्याचा आवाज येतो .

बिदाई हा नकोसा क्षण 

घेऊन येतं लग्न 

चालू होतं पोरीचं 

नवा संसार अनोळखीत जगणं

सामसुम होते पोरगी जाते 

बापाला गोळीची आठवण येते 

सवयीची साद पोरीस तो घालतो 

पाण्याचा समुद्र गाली आणून तिच्या फोटॊसंगे बोलतो ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन