STORYMIRROR

Santosh Jadhav

Romance

2  

Santosh Jadhav

Romance

मिठी

मिठी

1 min
2.8K


मिलनाची आस होती 

ती जवळपास होती 

दोन जीवं श्वास घेती 

घाबरत करीब पास येती 

अंग थरथर होई कधीचे 

ओझरते होते कटाक्ष आधीचे 

जास्तंच जवळ होतो आज 

मन मिलनाच्या ध्यासाचे 

स्पष्ट एेकु आली धडधड 

जवळ येता थांबली बडबड 

हात हाती शहारे अंगी 

श्वास फुलले ओठांची गडबड 

डोळे बंद ओठ ओठी 

कधीची उतावीळता मारली मिठी 

मिठी तिची भासला स्वर्ग 

हातांचा विळखा गच्च पाठी 

मनोमिलन झाले पूर्ण 

बांधल्या प्रेमाच्या गाठी 

अंधाराची छाया गडद 

अन् सैल झाली मिठी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance