मी
मी
कधीपासून
शुष्क बसून आहे मी
शोधतोय पलिकडल्या घरात
मुलगी मारून टाकलेल्या टाहो ला
शब्दालंकार...
बऱ्याच वेळचा तसाच बांधावर
बसून आहे मी
आत्महत्येला
शब्दात
पकड़ताच येत नाहिये मला...
पलिकडच्या गावचा शहिदाच्या
कलेवराची वाट पहात
उभा आहे मी गर्दित
सुन्न एकाकी
शोधतोय प्रतीक, प्रतिमा
कधिच्या..
वर्तामानाच्या मानगुटीवर
बसलेल्या कावळयांना
आनू पहातोय
कवितेच्या केंद्रस्थानी
मी उगाच रचतोय
प्रश्नांनी भरलेल्या
शब्दमडक्यांच्या उतरंडी
अंधाराच्या घरात
उजेड न देण्याची व्यवस्था
आधीच करुन ठेवली आहे
व्यवस्थीत व्यवस्थेने
माहीत असुनही..
पुन्हा एक वांझ कविता
जन्माला येतेय बहुदा
