STORYMIRROR

Vishal Ingole

Tragedy

2  

Vishal Ingole

Tragedy

माणसे

माणसे

1 min
14.2K


हे कोणते धर्म पाळतो आम्ही

चौकात माणसे जाळतो आम्ही

ती राहीली माय घरी उपाशी

दगडावरी असे भाळतो आम्ही

गीता, बायबल, कुरआन, वाचले

का आतली माणसे चाळतो आम्ही

माणसे झोपती उपाशी इथे यार हो

दारात विदेशी कुत्री पाळतो आम्ही

शहरी बांधले घर स्वच्छ सुसंस्कृत

दारात मळका बाप टाळतो आम्ही

भरावसा मनगटावरचा उठला की 

गळ्यात असे रुद्राक्ष माळतो आम्ही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy