आज
आज
आज वाचायला घेतले तुला.
तसेही डोळे, आरसे दाखऊ
शकत नाहीत उलगडुन
काहीच...
आपन उगाच ठेवतो विश्वास अश्या. धोकादायक गोष्टीवर..
भेटणे बोलणे बघणे
कधी हातात हात..
अगदी शरीरात शरीरे मिसळवतो आपन..
पण भेट होत नाही एकमेकांशी..
म्हणून मी आज वाचायला घेतले तुला...
तुझी कविता.. कवितेची प्रत्येक ओळ...प्रतिकं... प्रतिमा..संदर्भ..
प्रत्तेक शब्द....
जिथे तू खऱ्या अर्थाने..उघड़ी असतेस..आतून बाहेरुन..
मला ते वाचायचे आज...
म्हणून मी..
कविता वाचावी म्हणतो तुझी..
म्हणजे...
कदाचित मी समजून घेऊ शकेल तुला...
वरवरच हसन.. सुंदर दिसन ..
कमनीय देह..नशीले डोळे..
चेहऱ्यावर भाव भोळे
सारेच मोहमेळे..
पण.. मला वाचायचे आहे
या कातड़ी खाली लपउन ठेवलेले
संवाद...
त्या डोळ्यांच्या आत खोल
रुजलेले काहीतरी..
काळजाच्या संदुकात कुलुपबंद
वाचायच्या आहेत भावना..
या देखण्या..हसऱ्या मुखवट्या आड़...असलेला अस्सल चेहरा
काळजाच्या विहिरीतून
उपसुन आणायचाय
तळातला रंग गहरा
म्हणून मी तुला वाचायला घेतले आहे...
तुझी प्रत्तेक कविता..
प्रत्तेक ओळ..
साऱ्या प्रतिक प्रतिमा..
मी वाचणार आहे..
कवितेच्या..हळव्या मनाने
म्हणजे बहुदा..
तू मला सापडत जाशील
जशीच्या तशी..
आतून बाहेरुन उघड़ी...
बरे झाले..
तू कविता लिहिलीस...
नसता..
तू सापडली नसतीस कधीच कुणाला...
मी आज तुला वाचायला घेतले आहे

