बांधावर
बांधावर
मी उभा रहातो
गोफन घेऊन
वर्तमानाच्या बांधावर
समस्यांच्या धांडयाला
लागलेल्या
कणसावर बसु नये
शब्द पाखरु म्हणून
टीपला एखादा दाना
अन
झाली कविता तर
वाढू नये
वावराचे दुःखने
म्हणून..
मी उभा आहे
बांधावर
गोफन घेउन
