STORYMIRROR

Vishal Ingole

Inspirational

2  

Vishal Ingole

Inspirational

अगणित

अगणित

1 min
14.8K


दाटून येतं….

अगणित प्रश्नाचं

पावलागणिक समस्यांचं

दुष्काळी समाजच ..

हिरवकंच तन

जगण्याच्या मुळाभोवती

मग …

घरभर दाटीवाटीने उभे शब्द

सृजनाच्या अपेक्षेत …

मी घेतो कागद … पेन

उतरवतो .. सगळी घालमेल

कागदाच्या देहावर

अश्या फक्त ओकाऱ्या

कागदा ........ कागदावर

पण... मळमळ संपत नाही

नुसते कागद काळे करून

दाटलेले तन जळत नाही...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational