STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Tragedy Inspirational

जाणं तर आहेच सर्वांना एक दिवस

जाणं तर आहेच सर्वांना एक दिवस

1 min
220

जाणं तर आहेच सर्वांना एक दिवस पण

खरं सांगू मासारखं जगायचंच राहून गेलं

काय करणार फाटका संसार सदैव भिक्षांदेही

धडपडलो टीचभर पोटासाठी खोट्या प्रतिष्ठेसाठी


कळतेच रे मला न तुम्ही सांगितलेले सुद्धा

तुमचे डोळेच सांगून जातात बरंच काही

तुमचे धीराचे इशारे ती हतबलता प्रेम

भीतीने काळवंडलेले अश्रुनी डबडबलेले चेहरे


रागावू नका रे तुम्ही माझ्यावर

निरोप न घेताच निघालो म्हणून

झाली असतील लाख चुका

माफ करा तुम्ही मोठ्या दिलाने


आता मला निघायला हवं, भेटूयात

पुन्हा जरूर जगल्या वाचल्यावर

अश्रू नका ढाळू मी गेल्यावर

अशीच माया असू द्या कुटुंबावर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy