STORYMIRROR

Vaishali Dongre

Tragedy

3  

Vaishali Dongre

Tragedy

दिवाळी

दिवाळी

1 min
177

काहींच्या घरात दिव्यांची रोषणाई, 

काहींच्या घरात नाही

अंधार दूर करण्याची काहींच्या घरात सोय नाही

मनात इच्छा खुप काही पण इच्छेची पूर्तता होत नाही

काहींच्या घरातून येतात फराळाचे खमंग सुवास 

काहींच्या घरातून नाही

काहींच्या घरात दोन वेळच्या जेवनाचे जिन्नसही जुळत नाही

मनात इच्छा खुप काही पण इच्छेची पूर्तता होत नाही

काहींच्या घरात नव्या कपड्यांची आरास

काहींच्या घरात नाही

काहींना फाटकेही मिळत नाही

मनात इच्छा खुप काही पण इच्छेची पूर्तता होत नाही

काहींच्या घरात फटाक्यांची आतिषबाजी 

काहींच्या घरात नाही

काही पाहतात दुरूनच फटाक्यांची आतिषबाजी

मनात इच्छा खुप काही पण इच्छेची पूर्तता होत नाही

साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy