STORYMIRROR

Vaishali Dongre

Tragedy

3  

Vaishali Dongre

Tragedy

माणूस

माणूस

1 min
506

माणूस काय आहे?

माणूस पूज्यनीय आहे

माणूस वंदनीय आहे

माणूस निंदनीय आहे

माणूस त्यागनीय आहे


माणूस अनेक प्रकारच्या विकृतीने ग्रस्त आहे

माणूस अनेक प्रकारच्या स्वभावाने बद्ध आहे


माणूस भयंकर अनाकलनीय प्राणी आहे

तो कधी विषारी तर कधी अमृताची वाणी आहे


स्वतःच्या स्वार्थासाठी माणूस, माणसालाच छळतो आहे

आधुनिकतेतला माणूस, फक्त आधुनिकतेलाच कळतो आहे


विकासाच्या युगात विकारांची सत्ता आहे

न्यायासाठी देतो माणूस, अन्यायाला भत्ता आहे


युगामागून युगे गेली, माणुसही बदलत गेला

नीतिमत्ता सोडून तो, द्रव्याला पूजत गेला


माणूस पैशाने संपन्न, माणुसकीने रिता आहे

आता हीच त्याच्या जगण्याची, एकमेव प्रथा आहे


आता या प्रथेमध्ये तो, अनेकांना जोडत जाईल

आणि मूल्यधिष्ठित समाज आपोआप गळत जाईल


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy