STORYMIRROR

Vaishali Dongre

Tragedy

3  

Vaishali Dongre

Tragedy

वेदना

वेदना

1 min
323

वेदना या माझ्या मनीच्या कधी कोणी जाणेल का?

जीवन अवघे हे सारे आहे असेच सरेल का? 

वेदना या माझ्या मनीच्या..........


थाटला जरी संसार वाळवंटी, 

सारेच भासे रुक्ष रुक्ष सभोवताली

परि तू सागर होशील का? करुनी थंड दाह रुक्षतेचा

दाखला तू अस्तित्वाचा देशील का?


वेदना या माझ्या मनीच्या कधी कोणी जाणेल का?

जीवन अवघे हे सारे आहे असेच सरेल का? 


करण्यास ही लढाई यात 'तू' गुंतशील का?

आणि गुंतलास तू यात  'स्व' विसरुनी

 तर आम्हां परत मिळविशील का?


वाटेल मग आधार तुझा इतुका

की, कधी न व्हावे निराधार

जागेल उमेद नव्या जगण्याची

जगणे ते नवे शक्य होईल का?


वेदना या माझ्या मनीच्या, कधी कोणी जाणेल का?

जीवन अवघे हे सारे, आहे असेच सरेल का?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy