लास्ट मेसेज (शोकगीत)
लास्ट मेसेज (शोकगीत)
ती आणि तो खूप चांगले मित्र बनले.
हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडले.
तो सतत त्याच्या कामात बिझी असायचा.
ही मात्र आठवणीने त्याला मेसेज करायची.
कधी तो निवांत असेल तेव्हा तिचा,
मेसेज बघायचा,तर कधी इग्नोर करायचा.
ती मात्र कायम त्याच्या बोलण्याकडे आस लावून असायची.
कधी कधी तो तिच्या मेसेज ला,
आवर्जून रिप्लाय ही द्यायचा.
क्षणभर का होईना तिला दिलासा मिळायचा.
आज ही तिचा मेसेज आला.
रात्रीची वेळ हा कामात बिझी होता.
मेसेज तिचा न पाहता हा झोपी गेला.
उद्या तिला उत्तरं देता येईल ,
याच विचारात तो होता.
सकाळी सकाळी आठवण झाली तिची त्याला.
फोन हातात घेऊन कॉल तिला लावला.
तिच्या आई ने तो कॉल घेतला.
कुठे आहे ती त्याने विचारले.
काल रात्री अपघातात जीव तिने गमावला.
सुन्न होऊन याने कालचा तिचा मेसेज पहिला.
मी तुझ्या घरा जवळ आहे,अपघात झाला मला,
लवकर ये तुझी मदत हवी आहे मला.
कुठेच नाही ती आता, अश्रू डोळ्यात दाटले.
का नाही मी मेसेज पहिला शल्य हे मनी दाटले.
शून्यात एकटक नजर लावून तिच्या आठवणीत हरवला.
हाच एक जीवघेणा मेसेज तिचा शेवटचा ठरला.
