आयुष्य
आयुष्य
आयुष्य इतकं अवघड
का असतं??
आपल्याला हवं तेच
मिळत नसतं..
मिळालं तरी कायमचं
रहात नसतं
निसटून जातं हातातून
अगदी वाळूसारखं..
मनातलं कधी सांगता
येत नाही
न सांगता गप्पही
रहावत नाही..
काहीतरी चुकतंय असं
वाटत रहातं
पण नक्की काय?
समजत नसतं..
खरंच, प्रश्न पडतो
नेहमी मला
आयुष्य इतकं अवघड
का असतं?
