मातीचा सुगंध
मातीचा सुगंध
1 min
491
टपटप पडती थेंब मोत्यांचे
नभातूनी या रिमझिम सरींचे
मिलन होई थेंब मातीचे
मोहक तयाचा सुंगध पसरे
भरून घ्यावा श्वासामध्ये
मनाच्या बंद कुपीत साठवण्या
पुन्हा पुन्हा दरवळे मग
सुगंध प्रत्येक कोपर्यात मनाच्या
मातीच्या या सुंगधाने मन
पुन्हा एकदा मोहरून जावे
टपटप पडती थेंब मोत्यांचे
भेट घेण्या धरित्रीचे आसुसलेले
