पाऊस आला..
पाऊस आला..
1 min
276
चातकाची आर्त साद ऐकूनी
सोबत थंड वारा लेऊनी
कृष्ण मेघांच्या या दाटीमधूनी
टपोरे थेंब हे घेऊनी
तो आला..
तप्त धरणीला शितल करण्या
वृक्ष वेलींना चिंब भिजविण्या
मातीचा गोड सुवास पसरविण्या
सर्वांना आता 'जीवन' देण्या
तो आला..
आषाढीच्या वारीला तो आला
भक्तांना हर्षविण्या तो आला
भेट विठूमाऊलीची भक्ता घडविण्या
गरजत बरसत तो आला
पाऊस आला..
पाऊस आला..
