बाबांचे मन
बाबांचे मन
1 min
504
बाबांचे मन का
कधी कोणास समजले
झुरते ते कुटुंबासाठी
कधी कोणा कळले?
आधार त्यांचा नेहमी
पाठीशी भक्कम असतो
प्रत्येक गावात जसा
पूजनीय वड असतो...
राबणारा बाबा कुटुंबासाठी
स्वतः काटकसर करतो
कुटुंबाला आनंदात पाहून
स्वतः आनंदी होतो...
'स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी' जरी
बाबांविना आयुष्य म्हणजे
भरकटलेली नाव जशी...
