STORYMIRROR

शुभांगी दिक्षीत

Others

3  

शुभांगी दिक्षीत

Others

शाळेचा रस्ता

शाळेचा रस्ता

1 min
380

तोच जुना रस्ता 

मला आठवत राहतो 

शाळेच्या आठवणींमध्ये मला 

तो बोलावत राहतो ... 


चालत राहते रस्त्यावर 

भेटतात साऱ्या मैत्रिणी 

मनी फेर धरतात 

शाळेच्या त्या आठवणी .. 


गृहपाठ वर्गपाठाला होत्या 

आम्हाला वेगवेगळ्या वह्या 

असायच्या शिक्षकांच्या नेहमी 

' पूर्ण ' अशा सह्या .. 


टार्गेट पुर्ण करताना 

बॉसची सही लागते 

ही सही बघताना 

गृहपाठाची आठवण येते .. 


बदलला जरी रस्ता

जुना रस्ता आठवतो 

शाळेचा रस्ता आता

मनाच्या कप्प्यात राहतो ... 


Rate this content
Log in