आठवणींचं गाठोडं
आठवणींचं गाठोडं
आयुष्यातल्या काही क्षणांची साठवण
एक एक आठवण जमा
करत राहिले अन् त्या
आठवणीचं गाठोडं तयार झाले..
खुप आठवणी साठवल्या आहेत
काही आनंदाच्या काही दुःखाच्या
वेगवेगळ्या क्षणांच्या तर काही
आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या..
एकांत क्षणी त्या नेहमी
मनात माझ्या उलगडू पाहतात
मनाच्या कप्प्यात हळूच पुन्हा
हालचाल त्या करत राहतात..
मोरपिसारख्या असतात काही आठवणी
मनाला हळूवार स्पर्श करतात..
तर काट्यांसारख्या असतात काही
मनात कायम रुतून राहतात..
ओठांवर हसु आणतात काही
पापण्यांत अश्रु आणतात काही
आसु आणि हसु आणण्याची कला
आठवणींनाच नेहमी जमते कशी?
कोणत्याही असल्या आठवणी तरी
मनात कायम जपुन ठेवाव्यात
बनवून त्या आठवणींच गाठोडं
निवांत क्षणी हळूच उलगडाव्यात..
