बऱ्याच दिवसांनी
बऱ्याच दिवसांनी
बऱ्याच दिवसांनी आज
खूप मस्त वाटतंय
मला पुन्हा एकदा
जग नवं वाटतंय..
खुप झाली धावपळ
आता खुप झालं
शरीरासोबत आता माझं
मनही थकून गेलं..
आयुष्याचा पक्षी आता
पिंजरा तोडू पहातोय
आकाशी भरारी घेण्यास
तो पंख पसरतोय..
तुटेल एकदाच पिंजरा
घेईल नभी भरारी
आयुष्याच्या बंधनातून मग
होईन मुक्त मी..
बऱ्याच दिवसांनी खरंच
खुप मस्त वाटतंय
मुक्त अवकाश हे
मला आज खुणावतंय
