ही संध्या
ही संध्या
1 min
208
सागरतीरी मुक्त वावरते
लाटांंशी हितगुज करते
ही संंध्या..
दिनकरास निरोप देेऊनी
चंद्र ताऱ्यांसी बोलविते
ही संंध्या..
आईस ओढ घराची
पिलांची भेेट घडवते
ही संंध्या..
निसर्गाशी एकरूप होताना
आठवणी देऊनी जाते
ही संध्या..
