जुनं ते सोनं
जुनं ते सोनं
1 min
249
नव्याचे नऊ दिवस असताना
नव्या नवलाईत जग रमतं
कितीही मानलं तरीही
नेहमी जुनं ते सोनं असतं
जुन्या वस्तू, जुन्या आठवणी
सदैव साथ करत राहतात
मनातल्या सुखद कप्प्यांना कायम
मोगऱ्याप्रमाणे सुगंधित करून जातात
नव्या गोष्टी आल्या की
जुन्या गोष्टी अडगळीत जातात
सांभाळल्या जातात जिवापाड
कारण त्याच नेहमी सोन्यासारख्या असतात
