झळ आयुष्याची
झळ आयुष्याची
कशी सोसावी माणसा,
झळ ही आयुष्याची,
वेळ आलीय आता आगीतून उठून,
फोफाट्यात पडायची,
वाढत्या समस्यात भर त्या कोरोनाची,
अन भीती त्या लॉकडाऊन ची...
सर्कस आमची जगण्याची,
हातावरील पोट भरण्याची...
जगण्याच्या चढ उतारात,
शर्यत ही पुरून उरण्याची...
सांग मानवा,
कशी सोसावी झळ आयुष्याची.
तडफड आणि तळमळ ही जगण्याची,
इच्छाशक्ती द्या जगण्याची,
ताकद द्या संकट सोसण्याची,
अहो,
आभाळ कोसळते आमच्या स्वप्नांवर,
जेव्हा पाऊस बरसतो आमच्या पिकांवर...
सांग मानवा,
कशी सोसावी झळ आयुष्याची.
काय गम्मत आहे ना या कोरोनाची,
लॉकडाऊन च्या मदतीत घर भरतात श्रीमंतांची,
अन पोट भरतात गरिबांची,
वंचित मात्र पोरं सामांन्यांची...
सांग मानवा,
कशी सोसावी झळ आयुष्याची.
