STORYMIRROR

Pratik Kamble

Tragedy

3  

Pratik Kamble

Tragedy

मी अजून जिंकले नाही

मी अजून जिंकले नाही

1 min
13.6K


न्याय जरी मिळाला मला तरी 

मी आणखी जिंकले नाही

माझे आरोपी चढले फासावर

तरी मी आणखी जिंकले नाही

भाऊ माझा सागर शेजवळ

रिंगटोनमुळे मारला गेला

निकाल माझा लावून तुम्ही 

त्याचा निकाल मागे सारला गेला

प्रियंका भोतमांगे माझ्या ताईला

हरामखोरांनी तडफडून मारले

नुसते मारले नाही तर त्यांनी

तिला नग्न करुन मारले

नितिन आगे माझ्या भावाची

प्रेम प्रकरणातून हत्या झाली

माझ्या भावाच्या निकालासाठी 

न्यायव्यवस्थेला जाग नाही आली

फाशी झाली माझ्या आरोपींना 

तरी मी अजून जिंकली नाही

सागर, प्रियंका,नितिन यांच्यासाठी

न्यायव्यवस्था जागी झालीच नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy