STORYMIRROR

Pratik Kamble

Tragedy

3  

Pratik Kamble

Tragedy

बापू तुझ्या देशात....

बापू तुझ्या देशात....

1 min
27K


हे बापू .....

तुझ्या देशात बघ आता

टांगा पलटी अन् घोडे फरार

अशातली गत झाली रे

सांगून कोणच ऐकत नाही आता

त्या आणखी एक महाशय आलेत

*सबका साथ, सबका विकास* म्हणत


उकिरड्यावर नांगर चालवावा

असा नांगर चालवला जातोय

अन् खुले आम तोंड वर करून म्हणतात

*महाराष्ट्र देशा, गांधींच्या देशा*


कुठे महाराष्ट्र देश आणि कुठे गांधींचा देश

इथे तु फक्त नोटावरच दिसतो

हवा तसा, हवा तिथे विकला जातो

पण एका अर्थी बरोबरच आहे

होय आहे *महाराष्ट्र देशा,गांधीच्या देशा*

बघा ती बारबाला गांधीच्या पैशावर नाचते....

तो दलालसुद्धा गांधीच्या पैशावर भाव घातो....

ती माझी आई-बहीणसुध्दा गांधींच्या पैशासाठी वेश्याव्यवसाय करते....

तो हरामखोर आरोपी द्धा गांधींच्या पैशाच्या लालचे पोटी मर्डर करतो....

आणखी काय पाहिजे मग तुम्हाला

या *महाराष्ट्र देशाला, गांधींच्या देशा* म्हणायला


बघ ब्वा गांधी तूच तुझा रंग बदलतो

अन् आपसूकच मग महाराष्ट्राचा कायापालट होतो

बघ आता तुझ तूच बघून घे....

मी खुप प्रयत्न केले पण आवरता येत नाही



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy