STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Tragedy Inspirational

आम्ही सर्व सारखेच

आम्ही सर्व सारखेच

1 min
14.3K


शेअर करूया सुख दुःखरूपी आठवनिंची शिदोरी

मोडीत काढूया प्रस्थापितांची मुजोरी

जो कुणी म्हणेल माझीच लाल

करा की सिधद मग अस्तित्व खुशाल

                       आम्ही सर्व सारखेच

आम्हाला ना अपयश पचवता येते न यशाची गोडी चाखता येते

करायला जातो एक आणि घडते ते भलतेच

तुझं माझं जमेना अन तुझ्यावाचून करमेना

अवघड ठिकाणच दुखणं सांगताही येईना अन सहनही होईना

                       आम्ही सर्व सारखेच

सामान ध्येय , वाटचाल हि विधायक मार्गानेच चालू 

का मग विसरतो आम्ही एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ

वाईटच निषेध चांगलं ते चांगलंच त्याच तर कौतुकच करू

कधी कधी उगाचच लहानग निरागस मूलहि होऊ 

                       आम्ही सर्व सारखेच

 अनटचेबल मनाचा कोपरा अलगद पकडू

 हेवेदावे शह काटशह विसरून सार प्रतिभासंगम जगाला दावू

तत्त्वज्ञानाचा काथ्याकूट करू, वादविवादातून मनसोक्त भांडू

काहीही झालं तरी मानवतेचा झेंडा अखंड मिरवू

                     कारण आम्ही सर्व सारखेच


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy