STORYMIRROR

Rajesh Sabale

Tragedy

3  

Rajesh Sabale

Tragedy

दुष्काळ

दुष्काळ

1 min
14.6K


भर उन्हात आलाय, वादळ वारा कुठून।

गोल फिरत आकाशी घर ही गेले की उडून।।

 

वाट पाहून गेली, वरीस चार ही सरून।

नाही पाऊस पडला, का मळभ येत भरून।।

नाही पिकली शेती, शेतकरी गेलाय थकून।

अंग घामानं भिजल, मनहीि गेलय विटून।।

नाही गुरांना चारा भाकरी आणावी कुठून।

भर उन्हात गेलीय, जमीन सारी सुकून।।

 

नाही पियाला पाणी, तलाव गेले की आटून।

शेती भेगाडलीआता, जमीन गेलीय फाटून।।

किती बघावं आकाशी, मेघास बांधव बसून।

तरी वाटते मनात, येईल आकाश भरून।।

आस लाऊन बसला, चातक पक्षी अजून।

पाण्या वाचून गेली की, जिव्हा त्याची सुकून।।

 

किती काढावं कर्ज, हात पाय गेल्यात थकून।

कसं फेडाव कर्ज, सावकार थकले मागून।।

पोरी बळीच्या लग्ना, पैसा आणावा कुठून।

येता डोळ्यात आसव, शेतात रिकामं बसून।।

ढवळ्या पवळ्या मी टाकले, कसबा विकून।

काय पोटात घालू, घरदार टाकलंय विकून।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy