Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajesh Sabale

Tragedy

3  

Rajesh Sabale

Tragedy

जागर स्री शक्तीचा

जागर स्री शक्तीचा

1 min
177


स्री शक्तीचा जागर घालून, उगा टेंभा का हो मिरविता||

जन्म दिला ज्या शक्तीने, तिला पायीदळी तुडवीता||धृ||


 वरवर म्हणती देवी शक्ती तू, अंबा, जगदंबा विश्वाची|

आदिमाया शिवशक्ती जगाची, माया तू गं ईश्वराची|

नको नको त्या बढाया मारून, मला मखरात बसविता|

पोटात येते पाप तुमच्या, मी एकटी रस्त्यावर हिंडता||

वखवखलेल्या नजर तुमच्या, काय माय-बहीण जाणता|

अबला, वृद्धा, छोटी बालिका, भर रस्त्यात भोगीता||१||


किती बंधने घरी घालता, मी नाटक सिनेकात उघडी|

दात विचाकावून तरी पाहता, संस्कार संस्कृती नागडी||

अंगी भरजरी कपड्या मधला पुरुष, चित्रातमधी दाविता|

अंगी चिटकली भिजलेली साडीत, बाई का दाखविता||

ज्या मुशीतून तूम्ही जन्मला, तिचे पार वाभाडे काढता|

रस्त्यामध्ये दीन-दुबळ्यां महिलांची, छेड ही काढता||२||


नवरात्रीला सोहळा मांडला, यात नवसे गवसे किती|

भक्ती भावाने तुम्ही पूजिता, यांची वाटू लागते भीती||

घरतल्या रे पतिव्रतेला, तुम्ही लाथा बुक्यांनी मारता|

बाई बाटली घेवून हाती, तिला गं माडीवर बोलावता||

सांग भक्त हो आई जगदंबेचा, तुम्ही जागर का घालता|

तिच्या रूपातील स्री शक्तीला, का उगाच नागविता||३||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy