STORYMIRROR

Rajesh Sabale

Classics

3  

Rajesh Sabale

Classics

या गं श्रावण मासात

या गं श्रावण मासात

1 min
205

कधी ऊन पावसात, 

येते श्रावणाची सर।

मायेच्या प्रेमाला येतो , 

श्रावणात गं बहर।।


या ग श्रावण मासात, 

येती सरी वर सरी।

ऊन पावसाचा खेळ, 

मना भावतो तो भारी।।


रिमझिम पावसात, 

खेळ रंगतो गं दारी।

नांदायला गेली लेक, 

रोज आठवण करी।।


लेक सासुरवाशीण, 

झालं पाहुण माहेर।

नांदे सासरचा घरी, 

रोमारोमात माहेर।।


 नागपंचमीच्या सणा, 

लेक आली गं माहेरी।


सजल्या गं आया-बाय, 

करा गौराई साजरी।।


माहेरच्या अंगणात, 

फुलपाखर गं येती।

लेक आईच्या मायेची, 

झिम्मा फुगडी घालती।।


ऊन-वाऱ्या पावसात,

येते सरी वर सर।

दहीहंडी फोडण्यास, 

लावी थरावर थर।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics