जागर
जागर
होय हसू चेहऱ्यावर घेऊन
मी आज क्रांतीचं बीज पेरत आहे,
जातिभेदान बरबटलेल्या देशात
सर्वधर्मसमभावचा जागर मांडत आहे
हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई
सर्व गातात सहिष्णुतेची गाणी,
महार, मराठा, चांभार आणि कुंभार,
अहो जाती म्हणजे,
माणुसकीवरचा डोंगरा एवढा भार
जातीभेदावरून
जेव्हा घडतात इथे दंगली,
तेव्हा वाटतं,
जात म्हणजे भ्याड राक्षस हा जंगली
छत्रपती, आंबेडकर, फुले आणि शाहू
गुणगान त्यांचे किती मी गाऊ,
शिकवण त्यांची लोकशाहीची
नाही कोणत्या जातीपातीची
होय उन्मत्त मी, मुक्त मी,
समभावाचा जागर मांडत आहे
चेहऱ्यावरती हसू घेऊन
क्रांतीचं बीज पेरत आहे
