नेत्यांची मुजोरी
नेत्यांची मुजोरी
नेत्यांची मुजोरी पैशाचाच हेवा
उघड लॉकर देवा आता उघड लॉकर देवा
घोटाळा करतो डोळे मिटूनी जात नेत्याची
मनी नेत्याच्या का रे भीती ईडीची
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा
उघड लॉकर देवा आता उघड लॉकर देवा
सत्तेत असताना करती भ्रष्टाचार
विरोधात असता नुसत्या टीका त्यावर
ज्याच्या त्याच्या नावी आहे स्विस अकाउंट
इथे मिळत नाही कोणताच डिस्काउंट
उघड लॉकर देवा आता उघड लॉकर देवा
ईडीच्या तावडीत नाही कोणाचीच खैर
स्वतःचेच कर्म बनते स्वतःचे वैर
क्षणोक्षणी भ्रष्टाचार्यांचा तोल सावरावा
उघड लॉकर देवा आता उघड लॉकर देवा
नेत्यांची मुजोरी पैशाचाच हेवा
उघड लॉकर देवा आता उघड लॉकर देवा
