ती
ती
ती असते स्त्री
नसते कुणासाठी फ्री
ती असते लहान मोठी बहीण
जणू वनात पळणारे हरीण
ती असते बायको
का समजता तिला सायको
ती असते माय
जणू दुधावरली साय
ती असते बापाची नाजूक कळी
तरी का घेतात तिचा गर्भातच बळी?
ती असते अर्धांगिनी
तरी मागतात हुंड्यात मनी
ती असते आदिशक्ती
करूयात तिची पण भक्ती
ती असते कुणाचे कन्यारत्न
तरी अस्तित्वासाठी करावे लागतात यत्न
ती असते सखी
तरी राहावे लागते दुःखी
ती असते कुणाची राधा
तरी तिच्या आयुष्यात किती बाधा
ती आहे म्हणून आहे अस्तित्व
तरी तिला पाहावे लागते सत्व.
