रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी
1 min
261
धन्य ते देहू अन् धन्य ती आळंदी
तुका माऊलींच्या पावलांनी झाली पुण्य भूमी.
तुका झाला जगज्जेता, ज्ञानोबा माऊली.
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी।।
विठुनामाचा गजर, टाळ चिपळ्याच्या संग
मृदुंगाच्या तालावर, वारकरी झाले दंग.
चालूनी पायी आम्ही गाठली पंढरी
भेटाया पांडुरंगा उभा तो मंदिरी
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी।।
चंद्रभागेतीरी जमले सारे वारकरी
हरिनामाच्या घोषात दुमदुमली पंढरी,
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी।।
चंद्रभागेत करुनी स्नान, होती सारे पुण्यवान.
आलो देवा तुझ्या दारी
बोला रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी।।
