STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance Tragedy

5.0  

manasvi poyamkar

Romance Tragedy

याचना

याचना

1 min
14.1K


तुझ्या कठोर शब्दांवर

माझ्या नयनातून गंगा यमुना बरसावि

पाठमोरा तू उभाच कणखर

तुझं माझ्या अश्रूंची कल्पनाही नसावी

मी नुसताच हुंदका गिळवा

अश्रूंमागून अश्रू टिपवा

तू विखुरलेल्या शब्दांचा पसारा

मी एकेक करून सावरावा

सारेच क्षण मग सहन करावे

तू समोर असूनही बोलू न द्यावे

तुझ्या सांत्वनाची आशा करत

होरपळत हे क्षण सरावे

संसाराचा हा गाढा ओढताना

पाऊल माझेही थकले आहे

राग प्रेमाच्या या लढाईत

माझेच शब्द मला मुकले आहेत.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance