STORYMIRROR

manasvi poyamkar

Tragedy

3  

manasvi poyamkar

Tragedy

जपलेल्या आठवणी..

जपलेल्या आठवणी..

1 min
657

तशा तर खुप सार्या आठवणी

आहेत तुझ्या माझ्या

तू कदाचीत विसरला असशील

पण मी मात्र जपुन ठेवल्यात...


आता तो माझ्या सवयीचा दोष म्हण

की माझा बावळटपणा

पण तुझ्या सोबत चे क्षण गुंतलेत त्यात

जशी मी गुंतले होते तुझ्यात

अन तुही माझ्यात

ते सारे वचन साठवलेत मी

ह्या आठवणीत

माझे पाहिले गुलाबाचे फुल

आजही ज्याच्या पाकळ्या विसावल्यात पुस्तकात

कधी जी पान दिवस रात्र चाळायचा छंद होता

आज ती पाने मिटुन ठेवली आहेत मी

हृदयातल्या त्या दुखाप्रमाणे

वाट पाहतेय कधीतरी त्या पाकळ्या विरुन जातील

आणी हे मनातले दुख ही

सहन करण अशक्य झालय आता,

पण हिम्मत मात्र होत नाही त्यांना भिरकावन्याची!!

कारण आजही वाटते मला

कधीतरी त्याना हळुवारपणे तू हातात घेशील

आणि पुन्हा वचन देशील

सोबत राहायच

जस तू नेहमी दिलस मला

कधीतरी सोडून जाण्यासाठी ..

आणि मी मात्र कोरडे अश्रु गाळत राहिले निष्टुरपणे

वाट तुझी पाहण्यासाठी....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy