STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance Tragedy Others

4  

manasvi poyamkar

Romance Tragedy Others

एक आठवण..

एक आठवण..

1 min
772

एक आठवण

सुखाची साठवण

जपुन ठेवलिय मनात मी

तुझे ते हास्य

तुझ्या सोबतचा आनंद

जपुन ठेवलाय मनात मी...


मैत्रीचा एक दिवस

ज्यात फक्त तू आणी मी होते

सारे दुख सारुन बाजुला

मी तुझ्या सोबत होते

तुझ्या खळखळण्याचा स्वर

जपुन ठेवलाय कानात मी

एक आठवण

सुखाची साठवण

जपुन ठेवलिय मनात मी.....


जेव्हा जग नको होत

तेव्हा तू जग बनून समोर आलास

डोळ्यातले आसू ओठांवरचे हसू झाले

असे क्षण तू देवुन गेलास

सोबतचा ते दिवस रात्र

स्मरते स्वप्नात मी

एक आठवण

सुखाची साठवण

जपुन ठेवलिय मनात मी....


स्वार्थापायी जगातील

सारी नाती बिनसतात

सारे जग पाठ फिरवते

तेव्हाच मैत्रीचे अर्थ गवसतात

शब्द आठ्वते तुझेच सारे

जेव्हा असते दूखात मी

एक आठवण

सुखाची साठवण

जपुन ठेवलिय मनात मी.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance