मनमोहक निसर्ग
मनमोहक निसर्ग
1 min
434
रम्य अशी पहाट असावी
ज्यात फुलपाखरे खेळत असावी
वेल वेल अन पान फुलांवर
दवबिंदुंची मौज असावी..
गर्द राईच्या छायेमध्ये
पहुडलेलि संध्या असावी
कोमल सावल्यांत
निजेलेलि रात असावी....
असा सुंदर इंद्रधनूष्याचा
सडा अंगणी पसरावा
चौफ़ेर पसरलेली पालवी अन
अन निसर्ग असावा...
