सहवास..
सहवास..
1 min
545
त्यांचे थरथरणारे हात म्हणजे
केवळ पोकळ स्पर्श नसतो
तर मायेची ओढ लावणारा
एक उबदार हर्ष असतो...
त्यांच्या आशीर्वादात
सुखी होण्याचा आशावाद असतो
त्यांच्या कोमल वाणीमधे
वात्सल्याचा निनाद असतो...
म्हणुन आयुष्यात आजी आजोबा
सोबत असणे नशीब असते
थोरांच्या सहवासाशिवाय
यश हे परिपूर्ण नसते...
