STORYMIRROR

Latika Choudhary

Tragedy Inspirational

3  

Latika Choudhary

Tragedy Inspirational

वादळ ऊर्जा

वादळ ऊर्जा

1 min
13.1K


 कोणत्याही केव्हाही कधीही.

 कशाही कुठल्याही आत्मकेंद्री

 टोकदार पुरुषी अहंकाराला बळी

 पडू नये म्हणून..

कोंबत रहाते माय पोरीचं बाल्य

 कौमार्य, स्त्रीत्व चार दिवारीतच

अंधारल्या कोपऱ्यात ! 

भय असतं तिला त्या रोगी वृत्तीचं

 जी फक्त जाणते ' भोग'

असतं भय प्रोग्रामिंग बिघडलेल्या विकृत

काळ्या मनाचे जे करू पाहतात

 कोवळ्या कळीवर सिद्ध 

तथाकथित षंढ पौरुषत्व! 

निष्पाप फुलांना कुस्करणारे विकृत हात

अन आम्ल ओतणाऱ्या त्यांच्या गंजलेल्या कवटीत काय काय

असावेत फोफावेले सुडाचे तण

ह्याचे भय डोक्यात,,मनात, विचारात, पावलात शिरलेली साशंक आई ,

पोरीच्या अंकुरल्या, बहरल्या मांसाच्या उठावांना कोंबत राहते,

झाकत राहते मुठीत प्राण आणून !

 पोरीनं 'व्हर्जिन' रहावं म्हणून

सोपवते रूढी परंपरेच्या सोनेरी पिंजऱ्यात

अन पंख कापलेली 'ती' असहायपणे मारत रहाते

 वर्तुळातच हातपाय!   

तरी मुळातच अजिंक्य, अभेद्य ती ,

भरते वादळऊर्जा आपल्या पंखात

देत रहाते छेद प्रत्येक काळात गृहीत गृहितकाला बाईपणाच्या

आणि घेत रहाते कवेत आकाश

तोडत पाश झीडकारत दास्य

बाईपणाचे.!

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy